पदार्पणात सामनावीराचा किताब मिळेल हे स्वप्नातही वाटले नव्हते : अश्विनकुमार   

मुंबई : इंडिन्सच्या संघानं वानखेडेच्या घरच्या मैदानात आणखी एक ’हिरा’ लाँन्च केला. प्रतिभावंत खेळाडू निर्माण करणारा कारखाना असलेल्या मुंबई इंडिन्सच्या संघाने वानखेडेच्या घरच्या मैदानात आणखी एक ’हिरा’ लाँन्च केला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून अश्विन कुमार याने धमाकेदार पदार्पण केले. 
 
पदार्पणात पहिल्या बॉलवर पहिली आयपीएल विकेट घेणार्‍या या नव्या हिरोनं ३ षटकात फक्त २४ धावा खर्च करत तगड्या कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील फलंदाजीला सुरुंग लावत मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दैदिप्यमान कामगिरी करणार्‍या या पठ्ठ्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामुळे अश्वीनसाठी हा क्षण एकदम खास होता.
 
आपल्या पदार्पणातील कामगिरीबद्दल तो म्हणाला की,  मोहालीतील एका छोट्याशा गावातून आल्याचे सांगताना तो म्हणाला की, मेहनतीचं फळं मिळाले. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होईन, असं स्वप्नही कधी पाहिले नव्हते. लंचमध्ये काय खाल्ल होतेस? या प्रश्नावर तो म्हणाला की,  पहिला सामना असल्यामुळे थोडा नर्व्हस होतो.  मॅच आधी लंच न करता फक्त एक केळ खाल्लीे होते. असेही त्याने सांगितले. 
 
सामन्यानंतर त्याने गावची ओढ आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना पुढचे ध्येय यावरही भाष्य केले.  गावतील मंडळी माझा खेळ  पाहत असतील. मला कधी संधी मिळणार त्याची घरच्या मंडळींप्रमाणेच गावकर्‍यांनाही उत्सुकता होती. संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केल्याचे समाधान आहे. कामगिरीतील सातत्य राखून मुंबई इंडियन्सच्या विजयात असाच पुढेही मोलाचा वाटा उचलेन, असेही तो म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडताना अश्वनी कुमार याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. आयपीएलमध्ये पदार्पणातील सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो १० गोलंदाज ठरला. या सामन्यात त्याने ३ षटकात २४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये पदार्पणात भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोच्च कामगिरी ठरली.
 
मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडेच्या मैदानात यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर नवा स्टार अश्वनी कुमारसह ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर यांनी केलेल्या भेदक मार्‍यासमोर गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स  संघ अवघ्या ११६ धावांत आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या संघानं १२.५ षटकात ८ विकेट राखून सामना जिंकला. सूर्यकुमार यादवनं विजयी षटकार मारला. दुसर्‍या बाजूला रायन रिक्लटन  ४१ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ६२ धावांवर नाबाद राहिला. 

Related Articles